बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकात वाहनं पार्क करणाऱ्या प्रवाशांकडून दोन दोन पावत्या देऊन दुप्पट पैसे उकळले जात असल्याचा आरोप होत आहे. परगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे.

बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकात जिथे फक्त ₹30 शुल्क आहे, तिथे ₹60 किंवा ₹100 असे दुप्पट पैसे घेतले जात आहेत. एकाच वाहनासाठी दोन वेगवेगळ्या पावत्या दिल्या जात आहेत. या संदर्भात विचारणा केली असता समाधानकारक उत्तर दिले जात नाही. बस स्थानकात जास्त पैसे आकारले जात असून, लोकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे.
या संदर्भात पावती देणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारले असता, “असे करणे शक्यच नाही. एका वाहनासाठी फक्त एकच पावती दिली जाते आणि त्याचप्रमाणे शुल्क घेतले जाते,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या प्रकरणाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून लोकांची होणारी ही लूट थांबवावी, अशी मागणी जनतेकडून करण्यात आली आहे.


Recent Comments