Belagavi

बेळगावातील रूपा वर्णेकर यांना आयुष महासन्मान पुरस्कार

Share

बेळगावच्या सुरेश वर्णेकर आणि दिवंगत सावित्री वर्णेकर यांची कन्या आणि मुंबईस्थित योग थेरपिस्ट रूपा वर्णेकर यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.

मागील पाच वर्षांपासून समाजाच्या कल्याणासाठी करत असलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल आणि योगाच्या प्रचाराबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशभरातून शेकडो आयुष डॉक्टर आणि थेरपिस्ट सहभागी झाले होते. यामध्ये सिने अभिनेत्री श्रेया बुगडे, लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले, संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला व बाल सल्लागार डॉ. मंगला कोहली, भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयातील सहाय्यक संचालक डॉ. एम. गणेश, राष्ट्रीय सल्लागार डॉ. प्रणव पांड्या आणि डॉ. प्रवीण जोशी यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती.

यावेळी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन राज पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कांदे, आणि डॉ. दिशा चव्हाण, डॉ. रवी शिंदे, डॉ. रचित म्हात्रे, डॉ. जनार्दन यादव, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. राकेश झोपे, डॉ. विजय नवल पाटील आणि प्रवक्ते तुषार वाघमोडे यांसारखे पदाधिकारी उपस्थित होते.

रूपा वर्णेकर यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: