Vijayapura

‘त्या तरुणाच्या बहिणीला यत्नाळांनी दिली नोकरी : शब्द पाळल्याने कौतुक

Share

गणपती विसर्जन मिरवणुकीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या बहिणीला आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नोकरी दिली आहे. दिलेले वचन पाळल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजापूर शहरातील आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी नुकतेच गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शुभम सकपाळ या तरुणाच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, मृत शुभमची बहीण मोनिका सकपाळ हिला आमदार यत्नाळ यांच्या अध्यक्षतेखालील सिद्धसिरी सौहार्द सहकारी संस्थेत कनिष्ठ अधिकारी पदावर नियुक्त करून, तिला नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी आमदार यत्नाळ यांचे पुत्र आणि संचालक रामनगौडा पाटील, अण्णेप्पवर, प्रभू देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: