अनुसूचित जमातींमध्ये २९ उपजातींचा समावेश करण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध करत आज बेळगाव येथे कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत बेळगावमध्ये निषेध रॅली काढण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार कुरुबांसह तलवार, पारिवाळ आणि इतर २९ उपजातींचा अनुसूचित जमातीत समावेश करून अन्याय करत आहे. सिद्धरामय्या यांचा कार्यकाळ काही दिवसांचाच बाकी आहे. त्यामुळे कुरुबा समाजाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि केवळ व्होट बँकेसाठी हे कृत्य केले जात आहे. अनुसूचित जमातीकडून मते घेऊन निवडून आलेल्या आमदारांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, अशी मागणी महेश शिगीहळ्ळी यांनी केली. या वेळी कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments