विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात होरती गावात झालेल्या एका कार्यक्रमात, हरिहरच्या कालज्ञान मठाचे श्री सिद्धलिंग स्वामी यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री बनतील, असे म्हटले आहे.

श्री सिद्धलिंग स्वामी म्हणाले, “आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे हिंदू धर्माचे रक्षण करून पुढील काळात राज्याची सूत्रे हाती घेतील. ज्या घरातून ते बाहेर पडले, त्याच घराचे प्रमुख म्हणून ते राज्याचे भविष्य बदलतील. पुढील मुख्यमंत्री म्हणून ते विजापूर जिल्ह्याचे चित्र बदलून हिंदू धर्माचे रक्षण करतील.”

सिद्धलिंग स्वामींनी केलेली ही भविष्यवाणी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये नव्या चर्चेची सुरुवात असून यत्नाळ पुन्हा त्याच पक्षात प्रमुख बनतील, या स्वामींच्या भविष्यवाणीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ही भविष्यवाणी यत्नाळ यांच्या राजकीय भवितव्याला नवी दिशा देईल की भाजपच्या अंतर्गत राजकारणात आणखी उलथापालथ घडवून आणेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Recent Comments