बेळगावमधील शहापूर येथे पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या मार्केटमधील गाळे लवकरच व्यापाऱ्यांमध्ये वाटले जाणार आहेत. एका बाजूला चर्मोद्योग आणि दुसऱ्या बाजूला भाजीपाला मार्केटला प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली.

या मार्केटची पाहणी करण्यासाठी त्यांनी बेळगावच्या शहापूरमधील मार्केटला भेट दिली.
त्यानंतर ‘इन न्यू’ज’शी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, “काही कारणांमुळे पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या शहापूर मार्केटच्या दुकानांचे वाटप झाले नव्हते. आता स्थानिकांचे मत घेऊन महानगरपालिकेतर्फे रंगरंगोटी आणि विद्युत दिव्यांची व्यवस्था केली जाईल. एका बाजूला चर्मोद्योग आणि दुसऱ्या बाजूला भाजीपाला मार्केटला जागा दिली जाईल. चर्मोद्योगासाठी, आमदार निधीतून राज्यात एक आदर्श शोरूमसारखे मार्केट उभारले जाईल.” असे ते म्हणाले.
यावेळी नगरसेवक नितीन जाधव, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments