Belagavi

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

Share

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त बेळगावमध्ये अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला विद्यार्थी आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

शुक्रवारी बेळगावातील आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सोहळ्यानिमित्त डॉ. बी.आर. आंबेडकर उद्यानात मुलांसाठी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुमारे ३० विद्यार्थी आणि ४० हौशी कलाकारांनी भाग घेतला. आयएएस प्रोबेशनरी अधिकारी अभिनव जैन हे नोडल अधिकारी म्हणून उपस्थित होते. समाज कल्याण विभागाचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याविषयी माहिती देताना समाज कल्याण विभागाचे सहसंचालक आणि राजपत्रीत व्यवस्थापक मल्लिकार्जुन होसमनी म्हणाले की, ‘लोकशाहीबद्दल जागरूकता आणि माहिती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला विद्यार्थी आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये जिंकलेल्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर संधी दिली जाईल,’ असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी तालुका स्तरावर स्पर्धा झाली असून आज जिल्हास्तरीय स्पर्धा होत आहे. यासाठी चार विषय देण्यात आले आहेत, असे एम. डी. आर. एस. एस. पी. बहुरूपी यांनी सांगितले.

Tags: