
विजापूर शहरात वाहनांची चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आंध्र प्रदेशमधील चक्रधर संगेपू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १७ लाख १५ हजार रुपयांची कार आणि मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपी संजीव नेमुला आणि सुब्बाराव टी. फरार आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. याबाबत गोलघुमट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments