पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पत्नीला अटक झाली असतानाच, तिच्या प्रियकराचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील अंजुटगी गावाबाहेर घडली.

सिद्धप्पा क्यतककेरी असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात १ सप्टेंबर रोजी पत्नी सुनंदाने प्रियकराच्या मदतीने पती बीरप्पा पुजारी (३६) याला मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. आता तिचा प्रियकर सिद्धप्पा क्यतककेरी याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच, झळकी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ही घटना झळकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments