



गुरुवारी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा झालेल्या वन कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी.एन. इनवळ्ळी यांनी वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणातील वन कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
ते म्हणाले की, “वनसंपत्तीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वनसंपत्तीचे नुकसान हे मानवी स्वार्थापायी आणि वैयक्तिक फायद्यासाठी केले जात आहे. वन कर्मचारी केवळ वन्य प्राण्यांचेच रक्षण करत नाहीत, तर संपूर्ण वनसंपत्तीचे रक्षण करणे ही वन विभाग आणि पोलीस विभागाची संयुक्त जबाबदारी आहे.”
वनसंपदा वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा वन कर्मचानांचे बलिदान सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, बेळगाव वन विभागाचे मुख्य वन संरक्षक मंजुनाथ चौहान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments