बेळगाव तालुक्यातील हलगा गावातून विधानसभेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर कचऱ्याचे ढिग साचले आहेत, या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या परिसरात भाजीपाला आणि फळ प्रक्रिया करणारे दोन मोठे युनिट्स आहेत. त्यांचाही कचरा याच ठिकाणी टाकला जात आहे.
या रस्त्याने अनेक अधिकारी विधानसभेकडे येत-जात असतात, तरीही ग्रामपंचायतीचे या समस्येकडे साफ दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायत याकडे कधी लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.


Recent Comments