Belagavi

बेळगावातून मराठी फलक हटवण्याची करवेची मागणी

Share

बेळगावातील मराठी फलक हटवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिके (करवे) शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्य सरकारकडून कर्नाटकात कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. मात्र, महापालिका अधिकारी सरकारच्या आदेशांचे पालन करत नाहीत. जर तुम्हाला सरकारच्या आदेशांचे पालन करता येत नसेल तर नोकरी सोडून घरी बसा, मराठी भाषेतले फलक हटवण्याच्या कामाला लागा, अशी मागणी करवेच्या शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी बेळगाव महापालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांकडे केली.

“तुम्ही सरकारचा आदेश का पाळत नाही? असे तुम्ही वागत राहिल्यास नोकरी सोडून घरी बसा,” असे संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी करवे शिवरामेगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष साजिद हिरेकुडी, अख्तरा पठाण यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: