धारवाड जिल्ह्याच्या नवलगुंद तालुक्यातील गुडीसागर गावात तलावाचे पाणी पिल्याने १५ जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. या सर्वांना उपचारासाठी नवलगुंद येथील तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही दुर्दैवी घटना धारवाड जिल्ह्याच्या नवलगुंद तालुक्यातील गुडीसागर गावात घडली. तलावाचे पाणी प्यायल्याने १५ जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नवलगुंद येथील तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांनीही रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली.
डीएचओ होनकेरी यांनी सांगितले की, ‘तलावाच्या दूषित पाण्यामुळे ही घटना घडली असून, सर्व रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच, आरोग्य पथकाने गावात जाऊन नागरिकांची तपासणी केली असून, त्यांना आवश्यक औषधे दिली जात आहेत.’
या घटनेमुळे दूषित पाण्याच्या वापराबाबत गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.


Recent Comments