केएलई संस्थेच्या श्री बी.एम.कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय, शहापूर, बेळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट-३ च्या विशेष शिबिराचे उद्घाटन सोमवारी मन्नूर गावामध्ये करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक जिल्हा न्यायाधीश तथा बेळगाव स्थायी लोक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र जडियाप्पा होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायातील कायद्याचे महत्त्व, तसेच स्थायी लोक न्यायालयाची वैशिष्ट्ये आणि त्याचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल माहिती दिली.


Recent Comments