
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि युवा सबलीकरण व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडांगणावर आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे उद्घाटन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी प्रत्येकाने खेळाचा पुरेपूर फायदा घ्यावा. जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नाही, तर सहभागी होण्याची भावना महत्त्वाची आहे. शिक्षणासोबत खेळाची जोडणी केली, तरच जीवनात खिलाडूवृत्ती वाढते आणि यशाचा मार्ग सापडतो असे मत व्यक्त केले.
आज मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आपण खेळाचा आनंद विसरलो आहोत. परंतु, हे लक्षात ठेवा की खेळाने येणारी शिस्त, सहकार्य आणि लढण्याची वृत्ती जीवनात मोठे यश मिळवून देतात. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण प्रतिभावान आहे आणि आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आमदार आसिफ सेठ, क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास यांच्यासह अनेक खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments