बेळगावात खग्रास चंद्रग्रहणाचे औचित्य साधून मुलांमध्ये ग्रहणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे १२० हून अधिक मुलांनी चंद्रग्रहण पाहिले आणि त्याबद्दल माहिती घेतली.

खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील सिद्धरामेश्वर प्रसाद निलयातील मुलांसाठी सिद्धरामेश्वर शाळेच्या आवारात विज्ञान केंद्राचे शिक्षक राजशेखर पाटील यांनी दुर्बिणीची सोय केली होती. सिद्धरामेश्वर प्रसाद निलयाच्या १२० हून अधिक मुलांनी या दुर्बिणीतून खग्रास चंद्रग्रहण पाहिले. त्यानंतर विज्ञान केंद्राचे शिक्षक राजशेखर पाटील यांनी मुलांना चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्यात ग्रहणाबद्दल जागृती निर्माण केली.


Recent Comments