Vijayapura

चंद्रग्रहणामुळे विजापुरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीवर पडदे

Share

रक्तचंद्रग्रहणामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या दर्शनावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. विजापूर शहरातील मंदिरे आणि सार्वजनिक गणेशमूर्तींवरही पडदे लावण्यात आले आहेत. शहरातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.

सिद्धेश्वर मंदिर, सुंदरेश्वर मंदिर, राम मंदिर आणि शनि मंदिरांचे दरवाजे ग्रहणामुळे बंद करण्यात आले आहेत. ग्रहणाचे वेध लागल्याने दुपारपासूनच मूर्तींवर पडदे लावण्यात आले आहेत. शहरातील बीएलडी रोडवरील सनातन हिंदू महागणपतीच्या मूर्तीवरही पडदा लावण्यात आला असून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना परत पाठवण्यात आले आहे.

Tags: