Belagavi

धर्मनाथ दिगंबर जैन मंदिरातून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Share

बेळगावातील धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर आणि दक्षिण भारत जैन सभा माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंग यांच्या वतीने षोडशकरण भावना आणि दशलक्षण महापर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना डॉ. नागराज मरेण्णवर म्हणाले की, “गेल्या २५ वर्षांपासून हा धार्मिक महोत्सव साजरा केला जात आहे.” यावर्षी ३५ भाविकांनी व्रत-उपासनेमध्ये सहभाग घेतला. आज महोत्सवाचा नववा दिवस असून, आजच्या दिवशी ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले जात आहे. षोडशकरण भावना म्हणजे १६ भावनांचे आचरण करणे असून, आज ‘परिहार शुद्ध भावना’ साजरी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी अनेक श्रावक आणि श्राविका उपस्थित होत्या.

Tags: