गणेश मूर्ती पाहण्यासाठी जातो, असे सांगून घरातून गेलेले दोन अल्पवयीन मुले शुक्रवारी बेपत्ता झाले होते. दोन्ही मुले शनिवारी सुखरूप सापडली आहेत.

बेळगावच्या अनगोळ येथील शिवशक्ती नगर मध्ये राहणारे १० वर्षीय अनमूल शंकर परियार आणि ८ वर्षीय कार्तिक अर्जुन परियार हे शुक्रवारी गणेश मूर्ती पाहण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर गेले आणि बेपत्ता झाले. यानंतर उद्यमबाग पोलीस ठाण्यात मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. पहिल्या रेल्वे गेटजवळ चेतन शिवप्पा कोमन्नवर नावाच्या मुलाच्या मदतीने गणेश मंडळाच्या बंदोबस्तात असलेले होमगार्ड मायप्पा सनदी यांनी दोन्ही मुलांना शोधून काढले.


Recent Comments