बेळगाव शहर पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी बसवन कुडची गावात स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली.

यावेळी ते माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांच्यासोबत बसवन कुडची गावातील गांधी गल्ली येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी गावातील इतर सर्व गणेश मंडळांनाही भेट दिली.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शंकर दिवटे, बजरंग बेडका, मानजी चौगुले, राजू हंबनवर, नीळकंठस्वामी हिरेमठ, किरण बेडका, गजानन दिवटे, अशोक जोडगुंडे, संतोष चौगुले, प्रकाश जोडगुंडे, परशुराम दिवटे, भरत चौगुले यांच्यासह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments