पदवीपूर्व मंडळाच्या वतीने १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अंगडी पी.यू. कॉलेजने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले, ज्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सुमारे १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमधून १३ मुले आणि ११ मुलींची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्राचार्य संजीव कुमारमठ, जीतेंद्र काकतीकर, डॉ. अमित जडे, व्ही. एस. पाटील, विश्वनाथ धामणेकर आणि शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते.
या स्पर्धेला बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनने तांत्रिक सहकार्य दिले. असोसिएशनचे सरचिटणीस आणि मुख्य पंच जीतेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले होते. सुहास, लक्ष्मण नायक, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर, शाहीर शेख, अमित वेसने, राजा राजपूत, भूषण पटेल, चंदन जोशी, अक्षय परमोजी आणि परशुराम काकती यांनी पंच म्हणून काम पाहिले.


Recent Comments