Hukkeri

हुक्केरीत विविध पोलीस दलाचे पथसंचलन

Share

हुक्केरी शहरामध्ये कोणत्याही अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी भद्रावतीच्या रॅपिड ॲक्शन फोर्सने (आरएएफ) संचलन केले.

गेल्या नऊ दिवसांपासून शहरात गणेशोत्सव सुरू आहे. तसेच, शुक्रवारी ईद-ए-मिलाद आणि इतर अनेक कार्यक्रम असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून गोकाकचे डीएसपी रवी नायक यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. यामध्ये हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापुरे आणि घाटप्रभाचे पोलीस निरीक्षक हसन मुल्ला यांच्यासह हुक्केरी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ६० जवानांच्या विशेष तुकडीने शहरात संचलन करत लोकांमध्ये जागृती केली.

शहरातील नाका नंबर १ पासून सुरू झालेली ही रॅली बाजार रस्त्यावरून झेंडा कट्टी, तुरबंधी गल्लीतून नवीन बस स्थानक मार्गे कोर्ट सर्कलपर्यंत काढण्यात आली.

Tags: