विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील हिरेबेवनूर तांडा क्रॉसजवळ पोलिसांनी आणि अन्न निरीक्षकांनी संयुक्त कारवाई करत, बेकायदेशीररित्या साठवलेला रेशनचा तांदूळ जप्त केला.

या प्रकरणी सोलापूरमधील फिरोज नुरेवाले आणि संजीवकुमार तेंगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक टमटम गुड्स वाहन, ४ किलो तांदळाचे नमुने, ८८० किलो तांदूळ, अशा एकूण ६०,६३६ रुपये किमतीच्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. इंडी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय सोमेश गेज्जी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments