Belagavi

नविगल्लीच्या गणपतीची मनपा आयुक्तांच्या हस्ते आरती

Share

बेळगावातील शहापूरमधील नविगल्ली येथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव वायुपुत्र सेना मंडळाने प्रतिष्ठापित केलेल्या विष्णू अवतारी गणपतीची महानगरपालिका आयुक्त शुभा. बी. यांनी आरती केली. बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा. बी. यांनी बुधवारी सायंकाळी शहापूरमधील नविगल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव वायुपुत्र सेना मंडळाने बसवलेल्या विष्णू अवतारी गणपतीची आरती केली.

यावेळी त्यांनी मंडळाने गणेशोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. बेळगावात इतक्या मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत असल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक रवी साळुंके, नेताजी जाधव यांच्यासह सार्वजनिक श्री गणेशोत्सव वायुपुत्र सेना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांचा सत्कार केला

Tags: