बेळगाव :तालुक्यातील बोडकेनहट्टी गावात नुकतेच एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर दिवंगत सोमण्णा देवप्पा कोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आले.

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मातोश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बेळगाव येथील डॉ. रवी पाटील यांच्या विजया ऑर्थो ट्रॉमा सेंटरने सहकार्य केले. या शिबिरात शेकडो लोकांनी सहभाग घेऊन तपासणी करून घेतली.
शिबिरात डोळे, हाडे आणि रक्ताशी संबंधित आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजूंना मोफत औषधेही देण्यात आली. या शिबिरामुळे गावकऱ्यांसह आजूबाजूच्या भागातील अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाली, ज्यामुळे आयोजकांचे खूप कौतुक झाले.
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मातोश्री फाउंडेशन यांच्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली. डॉ. रवी पाटील यांच्या विजया ऑर्थो ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनीही या शिबिरात आपली सेवा दिली.


Recent Comments