Belagavi

बेळगावात ‘बीम्स’ रुग्णालयात गणेशोत्सवानिमित्त महाप्रसाद

Share

बेळगावमधील ‘बीम्स’ रुग्णालयाच्या आवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रुग्णालयाच्या आवारात असलेल्या श्री गणेश मंदिरात गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

गेल्या १०० वर्षांपासून येथे गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा असून, हा उत्सव ११ दिवस चालतो. या उत्सवाचे आयोजन ‘बीम्स’चे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि संपूर्ण ‘बीम्स’ परिवाराच्या वतीने करण्यात येते. यावर्षी गणेशोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते अशी माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी राज्याच्या सुख आणि समृद्धीसाठी गणेशाकडे प्रार्थना करण्यात आली. या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. या ११ दिवसांच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

Tags: