Belagavi

रस्त्याच्या विकासाबद्दल आम. आसिफ सेठ यांचा सत्कार

Share

बेळगावमधील संगमेश्वर नगरमध्ये रस्त्याचा विकास करून अनेक वर्षांपासूनची समस्या दूर केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार आसिफ सेठ यांचा सत्कार करत आभार मानले.

बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या हद्दीत येणाऱ्या संगमेश्वर नगरमधील रस्ता अनेक दिवसांपासून खराब होता, त्यामुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. अनेक दिवसांपासूनची ही मागणी स्थानिक लोकांनी आमदारांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सिमेंटचा नवीन रस्ता तयार केला. या कामामुळे स्थानिक रहिवाशांनी आमदारांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

यावेळी सत्कार स्वीकारल्यानंतर आमदार आसिफ सेठ म्हणाले, “तुमच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील सर्व भागांत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.”

Tags: