विजापूरमध्ये सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनादरम्यान एका दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहराच्या गांधी चौक परिसरातील टांगा स्टँडजवळ घडली.

मिरवणुकीवेळी गणेश मूर्ती नेत असताना विजेची तार वर करताना विजेचा धक्का बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये डोबले गल्ली येथील रहिवासी शुभम संकळ (२१) याचा मृत्यू झाला. तर प्रभाकर जंगले आणि लखन चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पुढील तपास सुरू आहे.
शहरात सातव्या दिवशी शेकडो गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.


Recent Comments