Belagavi

अभिनेत्याच्या चाहत्याने बेळगावातील निराश्रित आजीला निवारा

Share

बेळगावात एका निराश्रित आजीसाठी घर बांधणाऱ्या आपल्या चाहत्याला अभिनेता सुदीपने फोन करून त्याच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

बेळगाव तालुक्यातील मार्कडेय नगर येथील निराश्रित आजी रत्नव्वा यांना अभिनेता सुदीपचा चाहता आदिषेश नायक यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन घर बांधून दिले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुदीपने मंगळवारी रात्री आदिषेश नायक यांना फोन करून त्यांच्या या चांगल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले.

सुदीपचा फोन आल्याने आदिषेश नायक भारावून गेले. त्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्याचा फोन येईल असे वाटले नव्हते. “सुदीप सरांनी फोन करावा, हे माझे भाग्य आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: