गणपती उत्सवाच्या पाचव्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. विजापूर शहरातील घरे, शाळा, सरकारी कार्यालये आणि विविध वस्त्यांमध्ये स्थापन केलेल्या विघ्नेश्र्वराच्या मूर्तींचे रविवारी सायंकाळी शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये विसर्जन करण्यात आले.

सायंकाळी गणेश मूर्तींची मिरवणूक काढत हा सण साजरा करण्यात आला. शहरातील महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केलेल्या गणेश मूर्तींना निरोप देण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या ‘ अशी प्रार्थना करत गणपतीला निरोप देण्यात आला.


Recent Comments