Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते नबीसाहेब दर्गा सामुदायिक भवनाचे उद्घाटन

Share

मुत्नाळ गावात सुमारे २० लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या नबीसाहेब दर्गा सामुदायिक भवनाचे उद्घाटन महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी केले. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जाती आणि धर्माचा कोणताही भेदभाव न करता सर्वधर्मीयांसाठी १४० हून अधिक धार्मिक केंद्रे उभारण्यात आल्याची माहिती यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. “संपूर्ण मतदारसंघात शांतता आणि सलोखा राहावा ही माझी इच्छा आहे,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी केदार शाखापीठाचे शिवानंद शिवाचार्य, अश्रफ पीर खाद्री अज्जनवरू, दर्गा अज्जनवरू एम.के. हुबळी, पी.जे. पारिशवाड, अडिव्हप्पा पाटील, देवेन्द्र तिगडी, सुनील अंकलगी, रुद्रप्पा मंगळगट्टी, बसनागौडा हुबळी, सलीम नदाफ आदी उपस्थित होते.

Tags: