केएलई संस्थेच्या लिंगराज पदवी महाविद्यालयाचा बीएचा विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट ओंकार प्रकाश लोगावी याची राष्ट्रीय सैनिक शिबिरासाठी निवड झाली आहे.

कर्नाटक आणि गोवा डायरेक्टोरेटमधून त्याची निवड झाली आहे. १ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२५ या काळात दिल्ली येथे हे शिबिर पार पडणार आहे. मैसूर येथे झालेल्या अंतिम फेरीत ओंकारने यशस्वी कामगिरी करत शिबिरात आपले स्थान निश्चित केले. कॅडेट ओंकार प्रकाश लोगावी याला बेळगावचे ग्रुप कमांडर कर्नल मोहन नाईक, २६ कर्नाटक एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील दागर, लेफ्टनंट कर्नल सिद्धार्थ रेडू, लिंगराज कॉलेजचे एनसीसी अधिकारी मेजर डॉ. महेश गुरनगौडर आणि सुभेदार मेजर कल्लप्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.
ओंकारच्या या यशाबद्दल केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, संयुक्त कार्यदर्शी डॉ. प्रकाश कडाकोळ, प्राचार्य डॉ. एच.एस. मेळिनमनी आणि २६ कर्नाटक बटालियनच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments