कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळ्ळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करत सोमवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना महासंघाने आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही दिले.

निवेदनामध्ये, मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात २०१८ पासून आत्तापर्यंत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
गेल्या तीन वर्षांत मलप्रभा साखर कारखान्यात ७२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे कर्नाटक राज्य शेतकरी संघटना महासंघाने लोकायुक्त आणि सरकारला सादर केले आहेत. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments