Belagavi

गणेश मिरवणूक मार्गाची आमदार आसिफ सेठ यांनी केली पाहणी

Share

बेळगावात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. सहा दिवसांनंतर गणेश विसर्जन होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आज आमदार आसिफ सेठ यांनी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली.

आज बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी गणेश विसर्जन मार्गावरील तयारीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत महापौर मंगेश पवार, महापालिका आयुक्त शुभा बी., पोलिस आयुक्त भूषण बोरसे, अभियंते आणि इतर अधिकारी उपस्थित होते. आमदार सेठ यांनी मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची स्थिती, पथदीप, रोषणाईची व्यवस्था आणि विसर्जन तलाव यारख्या मूलभूत सुविधांची तपासणी केली. तसेच, गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या सूचना आणि सल्ले दिले.

Tags: