Belagavi

कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

Share

बेळगावच्या कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळ आणि शांतताई वृद्धाश्रमाच्या संयुक्त विद्यमाने ५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना शाल, पुष्पहार आणि दैनंदिन आरोग्यासाठी उपयुक्त औषधी किट देण्यात आले.

या सन्मान सोहळ्यात कपिल भोसले, पप्पू लगडे, दीपक जाधव, अशोक जाधव, संजय वालावलकर, विनायक जाधव, राहुल पाटील, आकाश हुळियार, संतोष देवर, यशवंत राजपूत, जाधव, अरविंद देवर, सुधीर यादव आणि अरुण कुलाल यांच्यासह अनेक जणांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी यंग बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष अॅलन विजय मोरे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: