अलिकडेच नितीन जाधव यांनी आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल साइन बोर्डस हिंदवाडी आणि आनंदवाडी येथे उभारली असून आता पुन्हा अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन जाधव यांनी इंद्रप्रस्थ नगर मधील जक्कीर होंडा येथे दोन मोठे निर्माल्य कुंड कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. लोक जक्कीर होंडा तलावात
निर्माल्य टाकत होते. नितीन जाधव यांनी महानगरपालिका आयुक्तांना दोन निर्माल्यकुंड उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. आयुक्त शुभा बी. यांनी तात्काळ त्यांची व्यवस्था केली. इंद्रप्रस्थ नगरमधील लोक आनंदी आणि समाधानी आहेत आणि त्यांनी आमदार अभय पाटील, नितीन जाधव आणि आयुक्त शुभा बी. यांचे आभार मानले आहेत.

या वेळी सुनील काकतकर, आसावरी भोकरे, राजेंद्र रेवणकर, सुरेश लिंबिकाय, श्रीकांत देशपांडे, सुदर्शन आजगावकर, विरेश मलिमठ आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


Recent Comments