Belagavi

केएलई रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शंकर परसण्णावर यांचे निधन!

Share

केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे जनसंपर्क अधिकारी शंकर फकीरप्पा परसण्णावर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी ते ५६ वर्षांचे होते.

मूळचे बैलहोंगल तालुक्यातील संपगाव येथील असलेले शंकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने केएलई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दु:ख व्यक्त केले जात आहे.

Tags: