Belagavi

बेळगावमध्ये शेतकरी संघटनेचे आंदोलन!

Share

ग्रामीण भागातील शेतांपर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करत ‘नेगिल योगी रयत सेवा संघ’ या शेतकरी संघटनेने बेळगावात आंदोलन केले. या समस्येवर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बेळगावच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. बैलगाड्या, ऊस वाहून नेणारी वाहने आणि जनावरांसाठी चारा आणताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतात जाण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

यावेळी रवी पाटील, शंकर बोळण्णावर, कल्लप्पा हरियाळ, मनोहर सुळेबावीकर, राजू कडेमणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: