Vijayapura

‘हिंदू धर्माचा द्वेष सोडा, नाहीतर तुम्ही उद्ध्वस्त व्हाल’; खासदार रमेश जिगजिणगी

Share

“हिंदू धर्माच्या स्थळांविरुद्धचे षडयंत्र थांबवा. काँग्रेस आणि डावे मिळून हिंदू धर्माविरुद्ध कट रचत आहेत. यामुळे तुम्हाला काहीही मिळणार नाही, लोक हे सहन करणार नाहीत. महादेवाने डोळे उघडले, तर तुमच्यापैकी एकही जण वाचणार नाही,” अशा शब्दांत खासदार रमेश जिगजिणगी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

विजापूर शहरात ‘धर्मरक्षणासाठी धर्मस्थळ चलो!’ या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जिगजिणगी म्हणाले, “हिंदू धर्माचा विरोध केल्यास तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. आता तुम्हाला देशातून हाकलून दिले आहे, पुढे राज्यातूनही हाकलून देतील.”

धर्मस्थळाविरुद्ध सुरू असलेल्या षडयंत्राचा ‘एनआयए’ मार्फत तपास करावा, अशी मागणी करत विजापूर भाजपच्या वतीने ‘धर्मस्थळ चलो’ आंदोलन आणि भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली होती. या आंदोलनात माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी, जिल्हाध्यक्ष गुरुलींगप्पा अंगडी, उमेश कारजोळ, रवी बगळी, डॉ. सुरेश बिरादार, माजी उपमहापौर गोपाल घाटकामळे, शहर मंडळ अध्यक्ष संदीप पाटील (झळकी) यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: