सोमनट्टी गावात श्री रेणुका (यल्लम्मा) मंदिराच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे गुरुवारी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. हे मंदिर सुमारे ५० लाख रुपयांच्या खर्चातून बांधले जाईल. पहिल्या टप्प्यात १० लाख रुपयांचा निधी आधीच जारी करण्यात आला आहे, तर काम पूर्ण झाल्यावर उर्वरित निधी दिला जाईल, अशी माहिती मंत्री हेब्बाळकर यांनी दिली. यावेळी त्यांनी ‘सुंदर मंदिर बांधा’, असे निर्देशही दिले.

यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १४० हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार करून विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. प्रत्येक गावात मंदिरांच्या बांधकामासाठी निधी देण्यात आला आहे. मागणी असलेल्या अनेक ठिकाणी समाज मंदिरेही बांधली आहेत. अनेक ठिकाणी मंदिर बांधल्यामुळे गावाचे चित्रच बदलले आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी आर.के.आंजनेय, शंकरगौडा पाटील, शेखर होसूरा, बी.एम.बडिगेर, शिवानंद, यल्लप्पा निट्टूर, मल्लय्या पुजारी, बाळप्पा मास्तमर्डी, रामप्पा निट्टूर, होळप्पा नंदीगोळ, कल्लप्पा मास्तमर्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments