अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई तसेच अन्य मागण्यांसाठी माजी मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांच्या नेतृत्वाखाली नवलगुंद येथील शेतकऱ्यांनी धारवाड येथे आंदोलन करत राज्य सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला.

धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुनेनकोप्पा यांच्या नेतृत्वाखाली धारवाड ग्रामीण आणि नवलगुंद मतदारसंघातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. धारवाड जिल्ह्यात, विशेषतः नवलगुंद भागात, अतिवृष्टीमुळे मूग, उडीद आणि सोयाबीन यांसारखी पिके पूर्णपणे खराब झाली आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ पीक नुकसान, पीक विमा आणि भरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली. खराब झालेले मूग आणि मुगाचे पीक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आणि सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून यावे, अशी विनंती केली.


Recent Comments