‘धर्म रक्षणासाठी धर्मस्थळ चलो’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती विजापूरचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी दिली.

ते विजापूर शहरात बोलत होते. धर्मस्थळाविरोधात सुरू असलेल्या षड्यंत्राचा राज्य सरकारने एनआयए मार्फत तपास करावा, अशी मागणी करत २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता ‘धर्मस्थळ चलो’ कार्यक्रम आणि मोठा मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. “त्या दिवशी विजापूर शहराच्या गांधी सर्कल येथे सर्वांनी एकत्र यावे. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करेल, या ध्येयाने आपण धर्म रक्षणाचा संकल्प करूया आणि या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊया,” असे आवाहन रमेश जिगजिणगी यांनी केले.


Recent Comments