विजापूर जिल्ह्यातील मनगुळी येथील कॅनरा बँकेच्या दरोड्याप्रकरणी बँक व्यवस्थापक आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र, ग्राहकांना चोरी झालेल्या सोन्याचे मूल्य वाटप करताना बँक भेदभाव करत असल्याचा आरोप करत आज ग्राहकांनी कॅनरा बँकेला घेराव घालून जोरदार निदर्शने केली.

कॅनरा बँकेच्या मनगुळी येथील शाखेत मे महिन्यात मोठी चोरी झाली होती. यानंतर चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर ग्राहकांनी चोरी झालेल्या सोन्याचे मूल्य आजच्या बाजारभावानुसार देण्याची मागणी केली. सोन्याचे मूल्य वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हजारो ग्राहकांनी या आंदोलनात भाग घेतला.


Recent Comments