हुक्केरी येथील क्यारगुड्ड अवुजीकर महाराज आणि जगन्नाथ महाराज यांच्या स्मरणार्थ 29 आणि 30 ऑगस्ट रोजी जत्रोत्सव साजरा होणार आहे. त्याचबरोबर मंजुनाथ महाराजांचा कल्याण महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मंजुनाथ महाराजांनी दिली.

कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “शुक्रवार, 29 ऑगस्ट आणि शनिवार, 30 ऑगस्ट रोजी काकड आरतीने जत्रोत्सवाला सुरुवात होईल. या सोहळ्यामध्ये सद्गुरू मल्लेश्वर गोशाळा, गोपुरावर सुवर्ण कलशारोहण आणि मंजुनाथ महाराजांचा कल्याण महोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना विविध मठांचे धर्मगुरू, आमदार, मंत्री आणि मठाचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अवुजीकर ध्यान आश्रम आणि इंचगेरी आध्यात्मिक परंपरेच्या सर्व भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मल्लप्पा महाराजांनी कार्यक्रमाचे भित्तीपत्रक प्रसिद्ध केले. मठाचे परमभक्त प्रो. पी.जी. कोन्नूर, रामण्णा नाईक, नेमिनाथ सोल्लापुरे, शिरहट्टी येथील रवी कांबळे, बेळवी येथील महादेव नाईक आणि विश्वनाथ नाईक यावेळी उपस्थित होते.


Recent Comments