बेळगाव शहरातील बसवान गल्ली परिसरात काल मध्यरात्री दोन तरुणांनी विनाकारण वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

24 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 3:25 च्या सुमारास दोन तरुण हातात काठ्या घेऊन परिसरात आले. कोणतेही कारण नसताना त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर काठीने हल्ला करत नुकसान केले. त्यांच्या या कृत्यामुळे वाहन मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.


Recent Comments