राज्यातील पदवी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गोंधळ दूर करण्याची मागणी करत, पदवी विद्यार्थी धारवाडमध्ये रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. एआयडीएसओच्या धारवाड जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आणि सरकारवर संताप व्यक्त केला. राज्यात पदवी वर्गाची सुरुवात होऊन महिना उलटला तरीही महाविद्यालयांमध्ये अजूनही अतिथी प्राध्यापक नाहीत. राज्यातील सर्व सरकारी पदवी महाविद्यालये अतिथी प्राध्यापकांवर अवलंबून असल्यामुळे, वर्ग नियमितपणे सुरू नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. यामुळे त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे.

येत्या महिन्यात पदवी विद्यार्थ्यांच्या पहिल्या अंतर्गत परीक्षा होणार आहेत, पण अद्याप अभ्यासक्रमाला सुरुवातही झालेली नाही. यूजीसीचे नवे निर्देश आणि न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामुळे अतिथी प्राध्यापकांची नेमणूक रखडली आहे. शैक्षणिक बाबींमध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारचे निर्णय पाळणे बंधनकारक नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारला शैक्षणिक उपक्रम सुरळीत सुरू होण्यासाठी तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गोंधळ दूर करण्याचे आवाहन केले.


Recent Comments