बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर मधील प्रभाग क्रमांक ४६ येथील बुडाच्या हद्दीत पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.

बुडा सदस्य हनुमंत कोगाळी, बुडा अधिकारी अथणी आणि कंत्राटदार एन.एस. चौगले यांच्या उपस्थितीत या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. आम्ही जनसेवेसाठी नेहमीच तयार असतो असे प्रतिपादन यावेळी बुडा सदस्य हनुमंत कोंगाळी यांनी व्यक्त केले.


Recent Comments