Belagavi

बेळगावात एअरटेल सेवेत तात्पुरता व्यत्यय; ग्राहकांनी कार्यालयात जाऊन व्यक्त केला संताप

Share

बेळगावमध्ये एअरटेलच्या मोबाईल सेवेमध्ये तात्पुरता व्यत्यय आल्यामुळे शहरातील अनेक ग्राहक गोंधळलेले आणि चिंतेत आहेत. विशेषतः कॉलेज रोडजवळील एअरटेलच्या कार्यालयात मोठ्या संख्येने ग्राहकांनी येऊन आपला संताप व्यक्त केला.

एअरटेल सिम वापरणाऱ्या ग्राहकांच्या मोबाईलवरून कॉल लागत नसल्याची गंभीर समस्या समोर आली असून, अनेक ग्राहकांना आपली सिम कार्ड हॅक झाली असावी अशी भीती वाटत आहे. या असामान्य सेवेबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी कर्मचाऱ्यांकडून केली. गेल्या काही तासांपासून कॉल लागत नसल्याने अनेक ग्राहकांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळे येत आहेत. काही ग्राहकांनी त्यांच्या बँक आणि ओटीपी सेवांवरही परिणाम झाल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी संपर्क साधल्यावर, एअरटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “ही तांत्रिक समस्या असण्याची शक्यता आहे. ही समस्या लवकर सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Tags: