विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी शहरात काल रात्री झालेल्या ट्रॅक्टर ओढण्याच्या स्पर्धेदरम्यान डॉ. आंबेडकर भवनचे छप्पर कोसळून पाच तरुण गंभीर जखमी झाले.

ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या तरुणांवर अचानक छप्पर कोसळले. या घटनेत वसंत राठोड, अशोक, निंगप्पा, अली हाजीसाब मुल्ला, असिफ, भगवान आणि लक्ष्मण राठोड अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना बसवण बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments