अमावस्येमुळे आपल्या दोन बैलांना नदीत आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर मगरीने हल्ला करून त्याला पाण्यात ओढून नेल्याची दुर्दैवी घटना विजापूरच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील कुंचगनूर गावाजवळ घडली आहे.

कुंचगनूर गावाजवळच्या कृष्णा नदीत शनिवारी सकाळी ही घटना घडली. काशप्पा हणमंत कंबळी (वय ३८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अमावस्येमुळे तो आपल्या दोन बैलांना आंघोळ घालण्यासाठी नदीवर गेला होता, त्याच वेळी मगरीने त्याच्यावर हल्ला केला. वन विभाग, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बोटींच्या मदतीने नदीत काशप्पाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. काशप्पा यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे नदीकाठी मोठ्या संख्येने गावकरी जमले असून, शोध मोहीम वेगाने सुरू आहे. ही घटना मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments